maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

‘आयआयटी कानपुर- अपोलो हॉस्पिटल्स’ सामंजस्य करार

नवी मुंबई, ४ जानेवारी २०२३: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपुर आणि अपोलो हॉस्पिटल्स यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची घोषणा आज करण्यात आली. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे क्लिनिकल ऍप्लिकेशन आणि आरोग्यसेवा तंत्रज्ञानामध्ये दोन्ही संस्थांना हितावह ठरतील अशा इतर क्षेत्रांमध्ये एकमेकांच्या सहकार्याने संशोधन करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. एकात्मिक आरोग्यसेवा पुरवणारे आशिया खंडातील सर्वात मोठे रुग्णालय आणि तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व संगणक विज्ञान क्षेत्रात जागतिक कीर्तीची संस्था यांच्यादरम्यान करण्यात आलेला हा अशाप्रकारचा पहिला औपचारिक सहयोग करार आहे. आयआयटी कानपुरचे डीन संशोधन व विकास, प्रोफेसर एआर हरीश व अपोलो हॉस्पिटल्सचे डायरेक्टर अपोलो टेलिमेडिसिन प्रोफेसर कृष्णन गणपती यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी आयआयटी कानपुरचे डायरेक्टर प्रोफेसर अभय करंदीकर आणि अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे संस्थापक-चेअरमन डॉ प्रताप सी रेड्डी इतर मान्यवर उपस्थित होते.

अपोलो हॉस्पिटल्सचा एक विभाग अपोलो रिसर्च अँड इनोव्हेशन्स गेल्या दोन दशकांपासून वैद्यकीय संशोधन, नावीन्य, आरोग्य शिक्षण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवणे आणि त्याचा क्लिनिकल उपयोग या क्षेत्रांमध्ये नेतृत्व करत आहे. हृदय विकार, मधुमेह, सीओपीडी आणि अस्थमा, लिव्हर फायब्रोसिस यासारखे जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांच्या धोक्याचे अनुमान लावण्यासाठी आयएसओ प्रमाणित एआय-बेस्ड क्लिनिकल ऍप्लिकेशन सर्वात पहिल्यांदा निर्माण करणाऱ्या अपोलोने शिक्षण आणि उद्योगक्षेत्रातील जागतिक पातळीवरील नामांकित भागीदारांसोबत केलेल्या सखोल अभ्यासानंतर हे क्लिनिकल ऍप्लिकेशन क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये सिद्ध करून दाखवले आहे.

डॉ प्रताप सी रेड्डी, संस्थापक-चेअरमन, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप म्हणाले, “रुग्णांना वैद्यकीय तंत्रज्ञानातील सर्वात नवीन शोध आणि विकासाचे लाभ पुरवण्यात अपोलो समूह नेहमीच आघाडीवर असतो. आरोग्यसेवा क्षेत्रातील प्रज्ञावंतांची नवी पिढी विकसित करण्यात देखील हा समूह नेहमीच खूप सक्रिय असतो. दोन वैद्यकीय महाविद्यालये, युकेमध्ये एक मेडिकल स्कूल, अपोलो युनिव्हर्सिटी, नर्सिंग व हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशनमधील प्रगत प्रशिक्षण पुरवणाऱ्या २० संस्था, पीएचडी प्रोग्राम्स आणि स्पेशालिटीज व सुपर स्पेशालिटीजमधील ६२५ डीएनबी सीट्स यांच्यासह आम्ही आयआयटी कानपुरमध्ये केल्या जाणाऱ्या अभिनव संशोधनात मूल्य योगदान देण्यासाठी आमचा अनुभव व नैपुण्ये वापरण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या सहयोगामुळे अनेकांना शिकवण्याच्या व संशोधनाच्या अनेक संधी पुरवल्या जातील.”

अभय करंदीकर, डायरेक्टर-प्रोफेसर,आयआयटी कानपुर यांनी सांगितले, “राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची संशोधन व शिक्षण संस्था म्हणून आयआयटी कानपुरने उद्योगक्षेत्र आणि इतर संस्थांसोबत सहयोग करून विज्ञान, तंत्रज्ञान व अभियांत्रिकीमध्ये अत्याधुनिक बहुविषयक संशोधन पुरवण्यात आणि करण्यात सातत्याने गुंतवणूक केली आहे. आयआयटी कानपुरमध्ये सुरु करण्यात येत असलेले गंगवाल स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी हे देशात वैद्यकीय संशोधन आणि तंत्रज्ञानातील नावीन्य यांचा मिलाप घडवून आणून आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याच्या आयआयटी कानपुरच्या प्रयत्नांना अनुसरून आहे. आम्ही अपोलो हॉस्पिटल्ससोबत हा समझोता करार करत आहोत, भारतीय आरोग्यसेवा व्यवस्था मजबूत व आत्मनिर्भर बनवण्यात याचे योगदान खूप मोलाचे ठरेल.”

Related posts

एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, भुजबळ नॉलेज सिटी शाश्वत भविष्यासाठी वर्तुळाकार अर्थव्यवस्थेबद्दल व्यवसायांना संवेदनशील करणार

Shivani Shetty

फुटबॉल विश्वचषकासाठी वॉकरू स्पेशल एडिशन लाँच करण्यात आले

Shivani Shetty

पकंजबरेी,कावेरीप्रियमयांनीसोनीसबवरीलआगामीमाललका‘दिलदिया गललां’च्या कलाकारांसह सवु र्ण मंदिराला भटे िेऊन घेतला आशीवाणि

Shivani Shetty

Leave a Comment