maharashtraprimenews
ठळक बातम्या
आंतरराष्ट्रीयज्वेलरीठळक बातम्यादागिनेप्रदर्शन

जीजेईपीसी (GJEPC) च्या आयआयजेएस प्रीमियर २०२३ (IIJS Premiere 2023) ला अभूतपूर्व यश: आजपर्यंतची सर्वाधिक म्हणजे ७०,००० कोटींच्या पेक्षा जास्त व्यवसाय निर्मिती

भारत, ९ ऑगस्ट, २०२३: जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) द्वारे आयोजित आयआयजेएस प्रीमियर २०२३

(IIJS Premiere 2023) या ३९ व्या प्रदर्शनाची सांगता अतिशय जोरदार प्रतिसादासह व्यापारासाठी आजपर्यंतचा सर्वाधिक म्हणजे ७०,००० कोटींच्या पेक्षा जास्त व्यवसाय निर्माण करत झाली. ३ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२३ या दरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आणि ४ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या दरम्यान नेस्को गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर या दोन ठिकाणी भरलेल्या या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठया रत्न व आभूषण मेळाव्यामध्ये जवळपास ५०,००० पेक्षा जास्त दर्शकांनी भेट दिली.

पेपरलेस आणि पूर्णपणे डिजिटल असलेल्या या आयआयजेएस प्रीमियरमध्ये ३२५० स्टॉल्स आणि १८५० प्रदर्शक होते. दोन ठिकाणी व एकूण ७०,००० चौरस मीटरपेक्षा जास्त आकाराच्या विस्तृत क्षेत्रामध्ये पसरलेल्या भव्य जागेमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाला यूएसए, यूके, यूएई, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, कॅनडा, न्यूझीलँड, फिजी, कतार, मस्कत, इराण, इटली, बांग्लादेश, बहरिन, कुवेत, जर्मनी, टर्की, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम, श्रीलंका, कंबोडिया  यांसह ६५ पेक्षा जास्त देशांमधून आलेल्या २१०० परदेशी पाहुण्यांनी भेट दिली. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रतिष्ठित पाहुण्यांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या १६ देशांमधील शिष्टमंडळांनी या कार्यक्रमाला एक वेगळाच उच्च स्तरीय आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून दिला. प्रदर्शक आणि भेट देणारे पाहुणे या दोहोंसाठी मुंबईमधील २५ पेक्षा अधिक हॉटेल्स मध्ये जवळपास १०,००० रूम्स बुक करण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनात मशीनरी विभागात एक इटालियन मंडप देखील होता आणि त्यात ७ देशांचे प्रदर्शक होते.

वाणिज्य विभागाचे वाणिज्य सचिव श्री. सुनील बर्थवाल, कॉन्स्यूलेट जनरल ऑफ यूएसएचे कॉन्स्यूल जनरल श्री. माइक हॅन्केल, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आयएएस डॉ श्री. संजय मुखर्जी, दि बीअर्स समूहाच्या हिऱ्यांच्या व्यापार विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष  श्री. पॉल रॉले, जीआरटी ज्वेलर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. जी आर राधाकृष्णन, टायटन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सी. के. व्यंकटरमण, जीआरटी ज्वेलर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. जी आर अनंतपद्मनाभन आणि जीजेईपीसीचे चेअरमन श्री. विपुल शहा, जीजेईपीसीचे उपाध्यक्ष श्री. किरीट भन्साली, जीजेईपीसीच्या राष्ट्रीय प्रदर्शनाचे संयोजक श्री. नीरव भन्साली, जीजेईपीसीच्या राष्ट्रीय प्रदर्शनाचे सहसंयोजक श्री. मितेश गजेरा, कार्यकारी संचालक श्री. सब्यसाची रे यांच्या विशेष उपस्थितीने या भव्य कार्यक्रमाला शोभा आणली.

आयआयजेएस प्रीमियर येथे उपस्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळांचे प्रतिनिधी आणि जीजेईपीसीचे संचालक मंडळातील सदस्यांसमवेत वाणिज्य विभागाचे वाणिज्य सचिव श्री. सुनील बर्थवाल मिसळले. याबाबत बोलताना वाणिज्य विभागाचे वाणिज्य सचिव श्री. सुनील बर्थवाल म्हणाले, आयआयजेएस हे रत्न आणि आभूषणांचे जगातील सर्वात मोठया प्रदर्शनांपैकी एक आहे आणि आपण हे जे भव्य आयोजन करत आहोत त्याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटायला हवा. रत्न आणि आभूषण क्षेत्र हे शासनासाठी अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे कारण ते कामगार केंद्रित आहे. हे क्षेत्र आपल्या तरुणांमध्ये मोठ्याप्रमाणावर सर्जनशीलता व कलात्मकता निर्माण करते. जागतिक बाजारपेठेमध्ये अधिक मूल्य असलेल्या जडीव हिऱ्यांच्या दागिन्यांच्या क्षेत्राला विकसित करण्यावर आमचे विशेष लक्ष राहील.

   जीजेईपीसी (GJEPC) चे चेअरमन श्री. विपुल शहा म्हणाले, आयआयजेएस प्रीमियर २०२३ (IIJS Premiere 2023) ने मागील सर्व विक्रमांना मागे टाकत आणि  आमच्या अपेक्षा अधिक उंचावत अभूतपूर्व यश मिळवले आहे. या प्रदर्शनाने एकट्याच्या बळावर बाजारातील वातावरण बदलून टाकले आणि अगदी सण व लग्न सराया चालू होण्याच्या आधी योग्य वेळी व्यवसाय चक्र जोरदार सुरू केले. आयआयजेएस प्रीमियर २०२३ (IIJS Premiere 2023) मध्ये व्यापारासाठी रु. ७०,००० कोटींपर्यंतचा व्यवसाय निर्माण झाल्याचा अंदाज आहे, जो कोणाच्याही स्वप्नांपलीकडचा व ध्यानीमनी नसलेला आहे. एक प्रदर्शन म्हणून आता आयआयजेएस हे खऱ्या अर्थाने आपल्या उच्च पातळीच्या दर्जामध्ये आले आहे.

श्री. शहा पुढे म्हणाले, वेगवेगळया ६५ देशांचा सहभाग आणि २१०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय ग्राहक  एकत्रित करणारे हे प्रदर्शन येत्या काही महिन्यात देशाच्या निर्यातीला एक नवीन जीवन देण्याची ताकद ठेवतो.

जीजेईपीसीच्या राष्ट्रीय प्रदर्शनाचे संयोजक श्री. नीरव भन्साली म्हणाले, “प्रदर्शक आणि प्रदर्शनस भेट देणारे पाहुणे या दोघांचे त्यांनी केलेल्या अतुलनीय सहकार्याबद्दल मी आभार मानू इच्छितो. भारतातील ११०० शहरांमधून आलेले ५०,००० पेक्षा जास्त दर्शक आम्ही यावेळी पाहिले, ज्यामुळे हे प्रदर्शन आजपर्यंतचे सर्वात मोठे आणि भव्य आयआयजेएस प्रीमियर प्रदर्शन ठरले. आयआयजेएस प्रीमियरने यावेळी रत्न आणि आभूषण उद्योग क्षेत्रातील अशा दिग्गजांचा सत्कार केला ज्यांचे या क्षेत्रातील उत्कट व अफाट कार्य, आवड आणि समर्पण यामुळे उद्योगाची केवळ भरभराटच झाली नाही तर त्यांनी उद्योजकांच्या अनेक पिढ्यांना व कारागिरांना प्रेरणा देखील दिली. त्यानंतर आपल्या सुरेल व मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांनी ज्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली अश्या सुप्रसिद्ध गायक प्रीतमसोबत सर्वांनी आनंद व जल्लोषात रात्र साजरी केली.

जीजेईपीसी ने आपल्या या शानदार कार्यक्रमात ‘ज्वेलर्स फॉर होप हा प्रतिष्ठित ‘चॅरिटी डिनर’चे आठवे पुष्प आयोजित केले. या ‘चॅरिटी डिनर’च्या निमित्ताने जमा झालेला निधी महिला व लहान मुलांच्या समस्या आणि शिक्षण विषयक प्रश्न यासंबंधी कार्य करणारी एक आघाडीची एनजीओ, रिलीफ प्रोजेक्ट इंडियाला दान केला गेला. या कार्यक्रमामध्ये उद्योग क्षेत्रातील अग्रणी आणि समाजसेवक उपस्थित होते. शिवाय, आजचा आघाडीचा बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने खास स्वतः रिलीफ प्रोजेक्ट इंडियाच्या वतीने या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि संस्थेबाबत व त्यांनी भारतात निर्माण केलेल्या प्रभावाबाबत तो  बोलला. जीजेईपीसीने गेल्या सात वर्षात लाखों लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करत १३ एनजीओंना निधी उभारण्यासाठी मदत केली आहे.

‘जीजेईपीसी ४० अन्डर ४०’ उपक्रमाने उद्योगातील असाधारण अशी प्रतिभा आणि कल्पकता साजरी केल्याने आयआयजेएस प्रीमियर २०२३ ने एक सुंदर व निर्णायक क्षण अनुभवला.

जीजेईपीसी ने पहिल्यांदाच इनोव्ह८ ग्लोबल या नावाचा उपक्रम देखील चालू केला. या उपक्रमामुळे मागणीनुसार हवे तसे उत्पादन बनवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय ग्राहक आणि निर्माते यांच्यामध्ये संयोजन होण्यास सहाय्य होईल. या नावीन्यपूर्ण व्यासपीठाचे उद्दिष्ट व्यावसायिक परस्परसंवाद वाढवणे आणि यापूर्वी कधी ही नव्हती अशी उत्पादनक्षम भागीदारी वाढवून ती जतन करणे हे आहे.   

Related posts

वेदात मराठे वीर दौडले सात’ या आगामी मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अक्षय कुमार एकत्र

Shivani Shetty

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर अपक्ष उमेदवाराचा गंभीर आरोप

cradmin

जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने आयपीआरएस ची “वर्ल्ड बिहाइंड द म्युझिक” मोहिम

Shivani Shetty

Leave a Comment