maharashtraprimenews
ठळक बातम्या
Healthसार्वजनिक स्वारस्य

अधिक चांगल्या शुश्रुषेसाठी HIV चे लवकर निदान: फोर्थ जनरेशन प्रगत चाचण्या भरून काढत आहेत चाचण्यांमधील तफावत

भारतामध्ये, सुमारे २० लाख ३५ हजार लोक HIV (PLHIV) सह जगत आहेत, ज्यांतीले केवळ १० लाख ७८ हजार लोकांना आपल्या आजाराची कल्पना आहे. देशभरात HIV चाचण्यांच्या बाबतीत झालेल्या प्रगतीलाही पॅनडेमिकच्या काळात निदानसुविधा मिळविण्यात अडचणी आल्याने धोका निर्माण झाला आहे. भारतामध्ये चाचण्यांच्या बाबतीत तयार झालेली दरी सांधणे हे देशाकडून या संसर्गाला अधिक जोमाने प्रतिसाद देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. व्हायरल सप्रेशन अधिक तत्परनेने होण्यास मदत करण्यासाठी व २०३० पर्यंत नवीन HIV संसर्ग थांबविण्यासाठी सर्व HIV रुग्णांपैकी ९५ टक्‍के रुग्णांच्या आजाराचे निदान करण्याचे UNAIDS चे आखून दिलेले पहिले उद्दीष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनेही हे अत्यावश्यक आहे.

HIV पॉझिटिव्ह रुग्णांचे लवकर आणि अचूक निदान होणे हे आवश्यक उपचार शक्य तितक्या लगेच मिळण्यासाठीचा रुग्णाचा प्रवास सुलभ करण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. इतकेच नव्हे, तर यामुळे भविष्यातील HIV संक्रमणांनाही प्रतिबंध होतो. कारण आपल्या संसर्गाविषयी अनभिज्ञ असलेल्या व्यक्तींकडून हा विषाणू इतरांमध्ये संक्रमित होण्याची शक्यता ३.५ पट अधिक असते. शिवाय निदान लवकर झाल्याने रुग्णांमधील अपंगत्व आणि प्राणहानीचा धोकाही कमी होतो.

युनिसन मेडिकेअर अँड रिसर्च सेंटर, मुंबईच्या HIV इन इन्फेक्शियस डिजिजेस विभागाचे सल्लागार आणि AIDs सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. इश्वर गिलाडा म्हणाले,मुंबई आणि महाराष्ट्रावर असलेला HIV चा भार लक्षणीय आहे. HIV सह जगणार्‍या ७५ टक्‍के लोकांकडे टेस्टिंग सेवा करून घेण्याची सोय आहे, पण उर्वरित २५ टक्‍के लोकांच्या बाबतीत निदानात्मक उपाययोजनांच्या उपलब्धतेच्या बाबतीत एक मोठी तफावत आहे. रॅपिड पॉइंट-ऑफ-केअर चाचण्यांसारख्या सहजसुलभ आणि व्यापक स्तरावर उपलब्ध करून देता येण्याजोग्या HIV चाचण्या कठोर नियामक प्रक्रियांअंतर्गत वापरल्या गेल्यास आपण चाचण्यांच्या बाबतीतली ही तफावत भरून काढू शकू. वेळेवर केलेल्या चाचण्या आणि संसर्गाचे, विशेषत: जिथे उच्च व्हायरल लोडमुळे संक्रमणाचा धोका अधिक असतो अशा व्यक्तींमध्ये असलेल्या तीव्र स्वरूपाच्या संसर्गाचे निदान महत्त्वाचे आहे. यामुळे वेळच्यावेळी उपचार मिळण्यास मदत होते, ज्यातून रुग्णांना अधिक चांगले परिणाम मिळू शकतात, व त्याचवेळी संसर्ग पसरण्यासही अटकाव होऊ शकतो.

चिकित्सात्मक मांडणीमध्ये व्यावसायिक तज्ज्ञांद्वारे HIV चे वेगवान स्क्रीनिंग करणार्‍या पॉइंट-ऑफ-केअर चाचण्यांसारख्या नवसंकल्पना या संसर्गाच्या वेळेवर निदानाची हमी मिळण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. यामुळे लोकांना अधिक सुलभतेने निदानसुविधा उपलब्ध होतात व केवळ २० मिनिटांत अचूक निष्कर्ष प्राप्त होत असल्याने आपल्या संसर्गाची स्थिती सहज जाणून घेण्यासाठी ते सक्षम बनतात. भारतासारख्या देशासाठी, जिथे दुर्गम वा ग्रामीण भागांमध्ये निदान सुविधा मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत व स्वत:हून चाचण्या करून घेण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे, अशा ठिकाणी वेगवान पॉइंट-ऑफ-केअर उपाययोजना विशेष महत्त्वाच्या आहे.

आज, पुराव्यांचे पाठबळ लाभलेल्या फोर्थ जनरेशन तंत्रज्ञानावर आधारित वेगवान चाचण्यांच्या उपलब्धतेमुळे पॉइंट-ऑफ-केअर चाचण्यांचा दर्जा सातत्याने उत्क्रांत होत आहे, ज्यामुळे सेकंड आणि थर्ड जनरेशन चाचण्या मागे पडत आहेत. या नव्या चाचण्या वापरसुलभ आहेत आणि सध्या प्रचलित असलेल्या थर्ड जनरेशन रॅपिड चाचण्यांमधून सुटून जाणार्‍यासंसर्गांपैकी २८ टक्‍के संसर्ग शोधण्यात या चाचण्या यशस्वी ठरत आहेत. यामुळे एका मोठ्या लोकसंख्यागटाला आपल्या संसर्गाच्या स्थितीची माहिती मिळेल याची खबरदारी घेतली जाते, जेणेकरून अशा व्यक्तींना आपल्या स्थितीच्या व्यवस्थापनासाठी दर्जेदार आरोग्यसेवा सुरळीतपणे उपलब्ध व्हाव्यात. चाचणीमुळे रोगाचे लवकर निदान होण्यास मदत मिळते. संसर्गानंतर अगदी १५-२५ दिवसांत दिसू लागणार्‍या HIVअँटिबॉडीज आणि अँटीजेन ओळखण्याची क्षमता त्यांत असते. त्यामुळे, या चाचण्या अल्प कालावधीमध्ये अधिक अचूक निदान देतात. हे रक्तपेढ्यांसाठीच्या स्क्रिनिंगच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे, जिथे HIVनिदानासाठीचा कालावधी जवळजवळ निम्म्यावर येतो.

अबॉटच्या भारतातील रॅपिड डायग्नोस्टिक बिझनेस विभागाचे जनरल मॅनेजर सुनील मेहरा सांगतात,लोकांना देखभालीच्या बिंदूपाशी (पॉइंट ऑफ केअर) HIV च्या निदानासाठीच्या उपाययोजना अधिक व्यापक प्रमाणात उपलब्ध करून देण्याप्रती अबॉट कटिबद्ध आहे. पॉइंट-ऑफ-केअर चाचण्यांच्या चौथ्या पिढीमध्ये चाचण्यांचे नवे मापदंड प्रतिबिंबित झाले आहे, जे HIV-पॉझिटिव्ह प्रकरणांचे, अगदी व्हायरल लोड तुलनेने कमी असलेल्या प्रकरणांचेही लवकर निदान होण्यास सहाय्य करतात, ज्यातून रुग्णांच्या देखभालीच्या नव्या शक्यतांसाठीचा मार्ग प्रशस्त होतो. भारतामध्ये, आम्ही खासगी आणि सरकारी हॉस्पिटल्स व निदानकेंद्रांना नेक्स्ट जनरेशन संसाधनांची मदत पुरवित आहोत, जेणेकरून देशावरील HIV ताणाचा प्रश्न सुटण्यास मदत व्हावी.

उच्च संवेदनक्षमता आणि विशिष्टतेने सुसज्ज फोर्थ जनरेशन चाचण्यातीव्रतर संसर्गांचे निदान मागील पिढीतील चाचण्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात करतात. चाचण्या करून घेऊ पाहणार्‍यांमध्ये आढळून येणार्‍यासर्व HIV संसर्गांमध्ये अशा संसर्गांचे प्रमाण ते २० टक्‍के असते. यामुळे HIV संसर्ग झाल्याचे निदान होण्यासाठीचा विंडो पीरियड असा संसर्ग झाल्यापासून जेमतेम १२ दिवसांचाच राहतो. थर्ड जनरेशन चाचण्यांच्या बाबतीत याच निदानासाठी २० दिवस किंवा त्याहून अधिक दिवस हमखास लागतात.

त्यामुळे HIVपॉझिटिव्ह रुग्णांची चटकन ओळख पटते व त्यांना उपचारप्रक्रियेशी जोडता येते. यातून संक्रमणाची साखळीही तोडता येते, जे विशेषकरून महत्त्वाचे आहे, कारण तीव्र संसर्गाचा संबंध उच्च व्हायरल लोड आणि संक्रमणाच्या धोक्याशी असतो.

चाचण्यांमधील नवीन शोध ही HIV राष्ट्रीय स्तरावरील भार कमी करण्यासाठीच्या, या आजाराशी निगडित लांच्छन दूर करण्यासाठीच्या आणि लवकर व सुयोग्य उपचार मिळवून देत रुग्णांच्या स्थितीमध्ये अधिक चांगली सुधारणा करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना सहाय्य करणारी महत्त्वाची बाब आहे.

Related posts

जीआयएम-अपग्रॅड’ चा हेल्थ केयर मॅनेजमेंट ऑनलाईन अभ्यासक्रम

Shivani Shetty

भारतातील डॉक्टरांसाठी ‘क्लिनिकल इंटेलिजन्स इंजिन’

Shivani Shetty

ACETECH मुंबई 2022 मध्ये विसाका इंडस्ट्रीजचे भव्य शोकेस

Shivani Shetty

Leave a Comment