भारतीय स्टेशनरी आणि कला उत्पादनांच्या बाजारपेठेतील अग्रगण्य समग्र सर्जनशील उत्पादन कंपनी डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेडने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) कडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) दाखल केला आहे.
कंपनीची प्राथमिक समभाग विक्री १२,००० दशलक्ष रुपयांपर्यंत असून त्यामध्ये ३,५०० दशलक्ष रुपयांपर्यंत फ्रेश इश्यू आणि एकूण ८,५०० दशलक्ष रुपयांपर्यंतच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. विक्रीच्या ऑफरमध्ये कॉर्पोरेट प्रवर्तक, , F.I.L.A. Fabbrica Italiana Lapis ed Affini S.p.A द्वारे एकूण ८,०००.०० दशलक्ष रुपयांपर्यंत इक्विटी समभाग, संजय मनसुखलाल रजानी यांच्या वतीने २५० दशलक्ष रुपयांपर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि केतन मनसुखलाल रजानी यांच्या वतीने २५० दशलक्ष रुपयांपर्यंतचे इक्विटी शेअर्स यांचा समावेश आहे.
फ्रेश इश्यूद्वारे उभारलेला निधी लेखन उपकरणे, वॉटर कलर पेन, मार्कर आणि हायलाइटरच्या विस्तृत श्रेणीसाठी कंपनीच्या उत्पादन क्षमतेचा विस्तार करण्याकरता नवीन उत्पादन सुविधा स्थापन करण्याच्या खर्चातील् काही भागांच्या निधीसाठी वापरण्याचे प्रस्तावित आहे. तसेचसर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टासाठी वापरण्यात येणार आहे.
कंपनी मुख्यत्वे प्रमुख ब्रँड ‘DOMS’ आणि C3, Amariz आणि Fixy Fix या उप ब्रँड अंतर्गत तसेच देशांतर्गत बाजारात तसेच यूएस,आफ्रिका, आशिया पॅसिफिक, युरोप आणि मध्य पूर्व पट्टा व्यापून आंतरराष्ट्रीय स्तरावर ४० हून अधिक देशांमध्ये उत्तम डिझाइन केलेल्या,दर्जेदार स्टेशनरी आणि कला उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीचे डिझाइन, विकास, उत्पादन आणि विक्री करते. ३,७७० पेक्षा जास्त SKU चा समावेश असलेल्या उत्पादन श्रेणींमध्ये शैक्षणिक स्टेशनरी, शैक्षणिक कला साहित्य, पेपर स्टेशनरी, किट्स आणि कॉम्बोज, ऑफिस सप्लाईज, कला आणि क्राफ्ट आणि ललित कला उत्पादने यासह सात श्रेणींमध्ये वर्गीकृत केले आहे. आर्थिक वर्ष २३ पर्यंत, कंपनीची मुख्य उत्पादने जसे की पेन्सिल आणि गणितीय उपकरणे बॉक्सेसचा बाजारपेठीय हिस्सा अनुक्रमे २९% आणि ३०% आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये उत्पादनाच्या सादरीकरणामध्ये लक्षणीय विकास झाला असताना, सर्वात मोठ्या उत्पादन ‘पेन्सिल’ने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ३,८९९.८८ दशलक्ष रुपये असे एकूण उत्पादन विक्रीत ३१.६६% योगदान दिले. कंपनीचे अनेक उत्पादन श्रेणी आणि किंमतींमध्ये विस्तृत आणि वेगळे स्थान आहे. त्याने आर्थिक वर्ष २०२० पासून आर्थिक वर्ष २०२२ या कालावधीत महसुलाच्या बाबतीत DOMS ला भारतातील सर्वात वेगाने वाढणारी स्टेशनरी आणि कला सामग्री उत्पादने कंपनी बनण्यास सक्षम केले आहे.
कंपनीची ११ उत्पादन सुविधा केंद्रे उंबरगाव, गुजरात आणि बारी ब्रह्मा, जम्मू आणि काश्मीर येथे आहेत. कंपनीने संपूर्ण भारतातील मजबूत स्थान निर्माण केलेले असून कंपनीचे एक व्यापक मल्टी-चॅनेल वितरण नेटवर्क आहे. सर्वसाधारण व्यापारासाठी देशांतर्गत वितरण नेटवर्कमध्ये १०० पेक्षा जास्त सुपर-स्टॉकिस्ट्स आणि ३,५०० गावे आणि शहरांमध्ये ११५,००० पेक्षा जास्त रिटेल टच पॉइंट्स कव्हर करत ४५० हून अधिक कर्मचार्यांच्या समर्पित सेल्स टीमसह ३,७५० वितरकांचा समावेश आहे. ते आधुनिक व्यापार आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातूनही ग्राहकांना सेवा देतात.
देशाच्या आर्थिक विकासात शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. यासाठी, भारत सरकार या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवत आहे. भारत २०३० पर्यंत ३१३ अब्ज डॉलरची शैक्षणिक बाजारपेठ बनण्याची अपेक्षा आहे. भारतातील शिक्षणाच्या वाढत्या मागणीमुळे, गेल्या काही वर्षांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे भारतात स्टेशनरी उत्पादनांची मागणी वाढत आहे. भारतीय स्टेशनरी आणि कला साहित्य बाजारपेठेने गेल्या काही वर्षांपासून सतत वाढ दर्शवली आहे. आर्थिक वर्ष २३ पर्यंत मूल्यानुसार त्याचा अंदाजे आकार ३८,५०० कोटी रुपये इतका आहे आणि आर्थिक वर्ष २३-२८ या कालावधीत १३% च्या CAGR ने वाढून आर्थिक वर्ष २८ पर्यंत ७१,६०० कोटी रुपये बाजार मूल्य गाठण्याची अपेक्षा आहे.
साक्षरता दर आणि शिक्षण पातळी वाढल्यामुळे स्टेशनरी उत्पादनांची मागणी देखील जगभरात झपाट्याने वाढत आहे. स्पर्धात्मक किमतीत स्टेशनरी उत्पादनांच्या विविध श्रेणीचे उत्पादन करून भारत या मागणीचा फायदा घेऊ शकतो. भारतात कागद, रबर, प्लास्टिक आणि लाकूड यांसारख्या कच्च्या मालाची विपुल उपलब्धता आहे आणि कमी कामगार खर्चामुळे किफायतशीर उत्पादनात स्पर्धात्मक फायदा देखील आहे. यामुळे स्टेशनरी उत्पादनांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते, त्यामुळे ते आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसाठी अधिक आकर्षक बनतात. शिवाय, भारत सरकारने निर्यातीला चालना देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. त्यामध्ये देशाच्या निर्यात क्षमतेला चालना देण्यासाठी मेक इन इंडिया, PLI योजना यासारख्या विविध योजना आणि प्रोत्साहनांचा समावेश आहे. अलिकडच्या दशकांमध्ये भारत हे प्रमुख निर्यातदार राष्ट्रांपैकी एक बनले आहे, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था नवीन उंचीवर पोहोचली आहे. भारतामध्ये स्टेशनरी आणि कला साहित्य उद्योगक्षेत्राचा भरभराट होत आहे आणि देशाला स्टेशनरी उत्पादनांसाठी निर्यात केंद्र बनण्याच्या अनेक संधी आहेत.
विशेषत: लहान मुले आणि तरुण, प्रौढांना लक्षात घेऊन, त्यांना त्यांच्या सादरीकरणामध्ये स्पर्धकांपासून वेगळे उठून दिसण्याची मुभा देत आणि भारतातील आणि जागतिक स्तरावर उद्योग वाढीच्या संधींचा लाभ घेताना त्यांना एक धोरणात्मक लाभ मिळवून देत दर्जेदार उत्पादने विकसित करण्यावर आणि त्यांना परवडणाऱ्या किमतीत सादर करण्यावर DOMS चा मुख्य भर आहे.
जेएम फायनान्शियल लिमिटेड, बीएनपी परिबास, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि आयाआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. मॅरेथॉन कॅपिटल अॅडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेड आणि आयटीआय कॅपिटल लिमिटेड यांची कंपनीने कॉर्पोरेट सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.