maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

क्‍लीअरट्रिपकडून स्थिर हॉटेल बुकिंग्‍ज व ग्राहक अनुभवामध्‍ये वाढ करत ‘कॅन्‍सल फॉर नो रिजन’ लाँच

बेंगळुरू, १२ सप्‍टेंबर २०२३: क्‍लीअरट्रिप या फ्लिपकार्ट कंपनीनेकॅन्‍सल फॉर नो रिजनच्‍या लाँचसह ग्राहक अनुभवामध्‍ये वाढ करण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे. हे इंडस्‍ट्री-फर्स्‍ट वैशिष्‍ट्य वापरकर्त्‍यांना चेक-इन करण्‍यापूर्वी कधीही त्‍यांचे हॉटेल बुकिंग्‍ज रद्द करण्‍यास सक्षम करेल, ज्‍यासाठी अतिरिक्‍त खर्च करावा लागणार नाही. ज्‍यामुळे ते त्‍यांच्‍या पर्यटन अनुभवावर उत्तम नियंत्रण ठेवू शकतात.  

अगदी नावाप्रमाणे कॅन्‍सल फॉर नो रिजनग्राहकांना कारण कोणतेही असो त्‍यांचे हॉटेल बुकिंग्‍ज रद्द करण्‍यास आणि प्रति बुकिंग जवळपास २५००० रूपये रिफंड मिळण्‍यास सक्षम करते. ही ऑफर क्‍लीअरट्रिप प्‍लॅटफॉर्मवर सूचीबद्ध असलेल्‍या प्रत्‍येक देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय प्रॉपर्टीवर लागू आहे. ही अद्वितीय ऑफरिंग ग्राहकांच्‍या मुख्‍य समस्‍यांचे निराकरण करण्‍यास सज्‍ज आहे, जसे काही बुकिंग पॉलिसीज, ज्‍या शेवटच्‍या क्षणाला कॅन्‍सलेशन्‍स आणि अपेक्षित व वास्‍तविक हॉटेल अनुभवामधील तफावतींना प्रतिबंध करतात. कॅन्‍सलेशन पॉलिसी हॉटेल निवडण्‍यामधील प्रमुख घटक आहे. कॅन्‍सल फॉर नो रिजनच्‍या लाँचसह आमच्‍या ग्राहकांच्‍या मनातून कन्‍सलेशन पॉलिसीबाबतची चिंता दूर झाली आहे आणि आता ते क्‍लीअरट्रिपसह विनासायास बुकिंग करू शकरतात. सुरूवातीची ऑफर म्‍हणून वापरकर्ते विना अतिरिक्‍त खर्चासह क्‍लीअरट्रिपवरील या प्रिमिअम ऑफरिंगचा आनंद घेऊ शकतात.

या विकासाबाबत आपले मत व्‍यक्‍त करत क्‍लीअरट्रिपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अय्यप्‍पन आर. म्‍हणाले, ”क्‍लीअरट्रिपमध्‍ये आम्‍ही क्रांतिकारी ग्राहक-केंद्रित वैशिष्‍ट्ये सादर करत आहोत, जी वापरकर्त्‍यांना उत्तम स्थिरता व नियंत्रण देतात. अद्वितीय नवीन कॅन्‍सेल फॉर नो रिजनवैशिष्‍ट्यासह आमचा नाविन्‍यपूर्ण प्रवास व उच्‍च दर्जाचा युजर अनुभव देण्‍याचा उद्देश आहे. यामुळे आम्‍हाला ग्राहकांचा अधिक विश्‍वास मिळवता आला आहे,तसेच ग्राहकांना विनासायास प्रवासाचा आनंद घेण्‍यासोबत अधिक वेळा प्रवास करता येत आहे, ज्‍यामुळे पर्यटन क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येत आहे. हा आमच्‍यासाठी, आमच्‍या वापरकर्त्‍यांसाठी आणि आमच्‍या ३ लाखांहून अधिक हॉटेल सहयोगींसाठी बुकिंगच्‍या नवीन युगाचा शुभारंभ आहे.

क्‍लीअरट्रिप व्‍यापक युजर-अनुकूल, मूल्‍य-नेतृत्वित ऑफरिंग्‍ज सादर करत आहेत, जे वापरकर्त्‍यांना उच्‍च दर्जाचा अनुभव देतात. सीटी फ्लेक्‍समॅक्‍स ते मेडि कॅन्‍सेल ते नुकतेच अॅक्सिस बँकेसोबत भागीदारीसह कंपनी ग्राहकांना योग्‍य निर्णय घेण्‍यास आणि त्रासमुक्‍त बुकिंगचा अनुभव घेण्‍यास मदत करण्‍यासाठी सज्‍ज आहे. व्‍हीआयडीईसीने केलेल्‍या इंडस्‍ट्री बेंचमार्किंग संशोधनानुसार कंपनी नुकतेच देशातील दुसरी सर्वात मोठी ओटीए म्‍हणून उदयास आली.  

क्लीअरट्रिप बाबत

जुलै २००६ मध्‍ये लाँच करण्‍यात आलेली फ्लिपकार्ट कंपनीच्या मालकीची क्लीअरट्रिप प्रा. लि. ही भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणारी ऑनलाइन प्रवास तंत्रज्ञान कंपनी म्हणून उदयास आली आहे. एप्रिल २०२१ मध्ये फ्लिपकार्टने क्लीअरट्रिपचे १०० टक्के समभाग खरेदी केले. व्‍हीआयडीईसीच्‍या नुकतेच संशोधनानुसार क्‍लीअरट्रिप दुसऱ्या क्रमांकाची ओटीए कंपनी म्‍हणून उदयास आली. उद्योगातील आघाडीचे नवप्रवर्तक म्हणून पुढे येण्याच्या आक्रमक योजनेसोबत क्लीअरट्रिप एंड-टू-एंड प्रवास उपाययोजनांच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी एक वेगळे मूल्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सीटी फ्लेक्समॅक्स, सीटी फ्लेक्स आणि सीटी अपग्रेड अशा उद्योगातील सर्वप्रथम उत्पादनांसोबत क्लीअरट्रिपने ओटीए क्षेत्रात बदल घडवून आणण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. ग्राहककेंद्री दृष्टीकोनातून विविध प्रकारच्या फ्लाइट्स आणि हॉटेल्स अशी विविध उत्पादने एकत्र आणून क्लीअरट्रिप बाजारात एक खास स्थान निर्माण करते. ते आपल्या ग्राहकांना सुलभता, निवड, स्पर्धात्मक किमती आणि विशेष साहित्य या गोष्टी देते.

Related posts

स्‍टडी ग्रुप सहयोगी युनिव्‍हर्सिटींचे घवघवीत यश

Shivani Shetty

नवे सर्वेक्षण व “चक्कर को चेक कर” मोहिमेच्या साथीने अबॉट देत आहे व्हर्टिगो आजार समजून घेण्यास चालना

Shivani Shetty

डिजिकोअरच्या आयपीओला मिळाले प्रचंड यश

Shivani Shetty

Leave a Comment