maharashtraprimenews
ठळक बातम्या
ठळक बातम्यापर्यटनसंपादकीय

आसाम मध्ये देशी पर्यटक ५११ टक्के वाढले आणि परदेशी पर्यटकांची संख्या ७६३ टक्क्यांनी वाढली.

आसाम टुरिझमचा रोडशो बी टू बी परिषद मुंबईत ; बी टू बी बैठका, परिषद ; फिल्म टुरिझमस्नेही राज्य असल्याचा संदेश.

निवांत भटकंती, साहसी खेळ, जंगल पर्यटन आणि चित्रीकरणासाठी एकाहून एक सुंदर स्थळे असल्याचे दाखवून देण्याचा आसाम टुरिझमचा रोड शो द्वारे प्रयत्न.

मुंबई, ६ मार्च २०२३ – चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी आसाम हे अत्यंत नितांतसुंदर ठिकाण असून तेथे चित्रीकरणासाठी एकखिडकी योजनेद्वारे त्वरेने संमती मिळते अशी माहिती देण्यासाठी आसाम टुरिझम तर्फे आज हॉटेल ग्रँड हयात मध्ये रोड शो करण्यात आला. आसामचे पर्यटनमंत्री जयंत मल्ला बारुआ यांनी या बी टू बी परिषदेचे उद्घाटन केले. आसाम टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चे अध्यक्ष, उपाध्यक्ष पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सचिव तसेच पर्यटन खात्याचे अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी हजर होते. आसाम टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यात दोन्ही राज्यांमध्ये पर्यटन वाढीसाठी एकमेकांना सहाय्य करण्याबाबत सामंजस्य करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आसाम टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष रितुपर्ण बारुआ यांनी आपल्या स्वागतपर भाषणात पर्यटकांना आसामला भेट देण्याचे आवाहन केले. ती सफर हा तुमच्या आयुष्यातील नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव असेल, अशी हमी देखील त्यांनी यावेळी दिली.

आसाममध्ये चित्रपट पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आसाम हे चित्रपट पर्यटनासाठी सर्वात चांगले आणि अनुकूल राज्य बनविण्यासाठी आम्ही पुष्कळ प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्ही पुष्कळ सोयी सुविधा देत आहोत, यात एकखिडकी योजनेद्वारा चित्रपटांच्या चित्रीकरणाला त्वरेने परवानगी दिली जाते. तसेच चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांना अनेक सुविधा तसेच वेगवेगळ्या प्रकारचे साह्य दिले जाते, असे आसामचे पर्यटन, सार्वजनिक आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री जयंत मल्ल बारुआ यांनी सांगितले. आसाम हे देशाच्या सर्व भागांशी विविध मार्गांनी जोडले आहे, आसाम मधील रस्त्यांचे जाळेही अत्यंत चांगले आहे. आसाम मधील कायदा व सुव्यवस्था देखील अत्यंत चांगली आहे. तसेच आसाम हे धार्मिक व अध्यात्मिक पर्यटन, घनदाट जंगले तसेच विस्तीर्ण नद्यांमधील पर्यटन तसेच धाडसी खेळांचे पर्यटन यांच्यासाठी विख्यात आहे असेही ते म्हणाले.

यावर्षीच्या जानेवारी महिन्यातील आकडेवारीनुसार आसाम मध्ये सन २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यात देशी पर्यटकांच्या संख्येत ५११ टक्के आणि परदेशी पर्यटकांच्या संख्येत ७६३ टक्के वाढ झाली आहे, असे आसाम टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चे व्यवस्थापकीय संचालक आणि पर्यटन विभागाचे सचिव कुमार पद्मपाणी बोरा म्हणाले. सरकारच्या नव्या पर्यटन धोरणानुसार चित्रपट पर्यटनासाठी इज ऑफ डुईंग बिझनेसवर भर देण्यात आला आहे. आम्ही या धोरणाची वेगवान आणि परिणामकारक अंमलबजावणी करून आसामला सगळ्यात मोठे चित्रपट पर्यटनस्थळ म्हणून प्रस्थापित करणार आहोत. यासाठी आम्ही चित्रपट आणि पर्यटन क्षेत्रातील संबंधित लाभधारकांशी सल्लामसलत देखील करू, असेही ते म्हणाले. नवीन पर्यटन धोरण २०२२ हे जागतिक बँकेशी सल्लामसलत करून तयार केले आहे. तसेच पर्यटन क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीला चालना देण्याच्या आसाम सरकारच्या उद्दीष्ठांनुसार ते तयार केले आहे. त्यासाठी सरकारने टाटा, हयात यासारख्या मोठ्या समूहांबरोबर मोठ्या आदरातिथ्य-पर्यटन प्रकल्पांसाठी करारही केले आहेत. काझीरंगा, मानस येथे हे प्रकल्प उभारले जातील. सरकारने नुकताच पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला असून त्यामुळे राज्यात या क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

चित्रीकरण पर्यटनाच्या नकाशावर आसामला ठळकपणे पुढे आणण्यासाठी सरकारने व पर्यटन विभागाने उचललेल्या पावलांमुळे आपण खूप समाधानी आहोत. या प्रयत्नांची पुष्कळ गरज होती आणि या उपाययोजना करण्याची मागणी बराच काळापासून केली जात होती, असे विख्यात अभिनेता आदिल हुसेन यांनी यानिमित्ताने सांगितले.

हे चांगले निर्णय घेण्यासाठी आसामचे पर्यटन मंत्री जयंत मल्ला बारुआ आणि पर्यटन सचिव कुमार पद्मपाणी बरा यांनी केलेल्या प्रयत्नांचे मी मनापासून स्वागत करतो. आतापर्यंत फार कोणा पर्यटकांनी न पाहिलेले आसामचे नैसर्गिक सौंदर्य आणि समृद्ध परंपरा यांना आपल्या चित्रीकरणातून जगासमोर मांडण्याची संधी हिंदी चित्रपट उद्योग आणि ओटीपी प्लॅटफॉर्म जरूर साधेल अशी मला खात्री असल्याचेही ते म्हणाले.

लवकरच आसाम हे चित्रीकरण पर्यटन क्षेत्रात एक प्रमुख ठिकाण म्हणून उदयास येईल आणि त्यातून निसर्गरम्य आसामची ओळख साऱ्या जगातील प्रेक्षकांना होईल अशी माझी अपेक्षा आहे. आसाम हे पर्यटनाच्या दृष्टीने खरोखर ऑसम (नितांतसुंदर) आहे हे सिद्ध करण्यासाठी राज्य सरकार त्यांच्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करेल, अशी खात्रीही आदिल हुसेन यांनी व्यक्त केली.

या आजच्या रोडशो मध्ये आसामच्या पर्यटन क्षेत्राचा सर्वंकष आढावा घेणारे व सर्व आवश्यक माहिती देणारे व्हिडिओ प्रेझेंटेशन करण्यात आले. आसाम मधील प्रमुख निसर्गरम्य पर्यटन स्थळांची माहितीही त्यात देण्यात आली. येथे गेल्याने पर्यटकांना कशी धमाल मौजमजा करता येईल हेही त्यात दाखवण्यात आले होते. तेथे पर्यटकांना आराम करताना मन रिझविण्यासाठी नेमके काय पर्याय आहेत, तसेच आसाम मधील वास्तव्यात त्यांना कशी मौजमजा करता येईल याची माहितीही त्यात होती. आसाम मधील एकमेवद्वितीय जैवविविधता तसेच सांस्कृतिक वैभव आणि त्याचबरोबर तेथील अथांग नद्या, घनदाट जंगले, आकाशाशी स्पर्धा करणारे उंच पर्वत यांचे छायाचित्र प्रदर्शनही येथे मांडण्यात आले आहे. याद्वारे तेथे चित्रीकरण आणि पर्यटन यांच्यासाठी अमर्याद संधी असल्याचेही दाखवून देण्यात आले आहे.

आसाम – चित्रीकरण पर्यटन क्षेत्रातील सर्वात सुंदर व आश्वासन स्थान या विषयावर आयोजित परिसंवादात अनेक मान्यवर सहभागी झाले होते. यात शोभा संत (जिओ स्टुडिओ), वैभव मोदी (व्हिएओओ), जीनेश शहा (रॉय कपूर फिल्म्स), महेश मांजरेकर (अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक), सुमित कपाही (संचालक अबुंदंतिया एंटरटेनमेंट), अभिमन्यू राय (कास्टिंग डायरेक्टर), पद्मकुमार नरसिंहमूर्ती (चित्रपट दिग्दर्शक, लेखक), पार्थ महंत (डीआयजी, प्रशासन), संजीव नारायण (निर्माते) व करण ओबेरॉय सहभागी झाले होते. आदिल हुसेन तसेच इंडिया टुडे चे कार्यकारी संपादक कौशिक डेका यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. या परिसंवादात आसामचे पर्यावरण जपण्याबाबत तसेच आसाममधील नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन करण्याबाबतही चर्चा झाली. त्याचप्रमाणे राज्यातील पर्यटन विषयक क्षमतांची वाढ कशी करावी तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षून घेण्यासाठी काय काय करावे लागेल याबाबतही सहभागी मान्यवरांनी चर्चा केली. आसाम टुरिझम ची अत्याधुनिक वेबसाईटही तयार करण्यात आली असून याद्वारे पर्यटकांना हॉटेलचे ऑनलाईन बुकिंग, सफारीची आगाऊ नोंदणी आदी सर्व गोष्टी एकाच क्लिकवर करता येतील. पर्यटन क्षेत्राला आसाम सरकारने उद्योगाचा दर्जा दिला असून देशात अशा प्रकारे पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देणाऱ्या मोजक्या राज्यांपैकी आसाम हे एक राज्य आहे. आसाम हे पर्यटकस्नेही आणि गुंतवणूकदारस्नेही पर्यटनाचे प्रमुख केंद्र व्हावे यासाठी आसाम सरकार कटिबद्ध असून पर्यावरण पूरक आणि जबाबदार पर्यटन ही आसाम सरकारची व पर्यटन विभागाची प्रमुख उद्दिष्टे आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.

 

Related posts

अजित पवारांची फडणवीसांसोबत चर्चा; तर निरोपासाठी आलेल्या नार्वेकरांना शरद पवारांनी गाडीत बसवलं!

cradmin

नेक्सब्रँड इंक (NexBrands Inc) ने आयोजित केलेल्या ७ व्या वार्षिक ब्रँड व्हिजन समिटमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतातल्या उत्कृष्ट उद्योग समुहांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला*

Shivani Shetty

ऊषाची रिलायन्स डिजिटलसोबत भागीदारी, प्रीमिअम किचन अप्लायन्सेसची नवी आयशेफ रेंज सादर

Shivani Shetty

Leave a Comment