maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

एंजल वनची धोरणात्‍मक सुधारणा

मुंबई, १५ सप्टेंबर २०२३: सातत्याने उत्क्रांत होत असलेल्या फिनटेक उद्योगातील बाजारपेठेमधील आघाडीचे स्थान अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, एंजल वन लिमिटेडने व्‍यवसाय पुनर्रचना उपक्रम हाती घेतला आहे. या पुनर्रचनेचा भाग म्‍हणून कंपनीच्‍या सहाय्यक चॅनेलचा व्‍यवसाय एंजल सिक्‍युरिटीज लिमिटेड अंतर्गत कार्यान्वित असेल, तर प्रत्‍यक्ष चॅनेलचा व्‍यवसाय एंजल क्रेस्‍ट लिमिटेड अंतर्गत कार्यान्वित असेल. एंजल वनने सहाय्यक चॅनेल्‍सवर देखरेख करणारे चीफ बिझनेस ऑफिसर म्‍हणून निशांत जैन यांना ऑनबोर्ड करत आपल्‍या नेतृत्‍व टीमला प्रबळ केले आहे.

निशांत प्रमुख भागधारकांसोबत सहयोगात्‍मक भागीदारी करण्‍याच्‍या प्रयत्‍नांचे नेतृत्‍व करतील, तसेच सहाय्यक चॅनेलच्‍या धोरणात्‍मक विस्‍तारीकरणाच्‍या माध्‍यमातून व्‍यवसाय कामगिरीला नव्‍या उंचीवर नेतील. निशांत हे आयआयएम-बीचे माजी विद्यार्थी असून त्यांच्याकडे दोन दशकांचा गाढा अनुभव आहे. भारतपे आणि झोमॅटो यांसारख्या भारतीय स्टार्टअप्सना वाढीच्या दिशेने चालना देण्याचे असामान्य श्रेय त्यांच्या नावावर आहे. मल्‍टीनॅशनल एफएमसीजी दिग्गज कंपनी कोका-कोलामध्ये त्यांनी वरिष्ठ स्तरावरील नेतृत्वाचे पद भूषवले आहे.

निशांत यांच्‍या नियुक्‍तीसह कंपनी अधिक लक्ष केंद्रित करण्‍यास आणि या क्षेत्राच्‍या विकासाला चालना देण्‍यास सक्षम होईल. काळासह एंजल वन ग्रुप वैविध्‍यपूर्ण फिनटेक व्‍यवसाय बनली आहे, जेथे कंपनीच्‍या ऑफरिंग्‍जमध्‍ये इक्विटी, कमोडिटी व करण्‍सी डेरिएटिव्‍ह ब्रोकिंग, मार्जिन ट्रेडिंग सुविधा, डिपॉझिटरी सेवा, म्‍युच्‍युअल फंड्सचे वितरण, बॉण्‍ड्स व विमा उत्‍पादने, तसेच संशोधन विश्‍लेषण व गुंतवणूकीसंदर्भात सल्‍लामसलत सेवा यांचा समावेश आहे. एंजल वन लिमिटेडला नुकतीच सेबीकडून प्रायोजक म्हणून काम करण्यासाठी आणि म्युच्युअल फंडाची स्थापना करण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे.

एंजल वन लिमिटेडचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. दिनेश ठक्‍कर म्‍हणाले, “फिनटेक उद्योग झपाट्याने क्रांतिकारी बदलाच्‍या दिशेने वाटचाल करत आहे. अब्‍जो व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याचे आमचे ध्‍येय यशस्‍वीरित्‍या पूर्ण करण्‍यासाठी आम्‍ही अग्रस्‍थानी असणे गरजेचे आहे. निशांत यांना त्‍यांच्‍या क्षेत्रात व्‍यापक ज्ञान व कौशल्‍याचा अनुभव आहे. ज्‍यामुळे आम्‍हाला आमच्‍या विकास संधी वाढवण्‍यास निश्चितच मदत होईल. तसेच पुनर्रचनेसह ग्रुप भविष्‍यासाठी सुसज्‍ज असेल. सर्वोत्तम सहयोग करण्‍यात येतील, ज्‍यामधून व्यापक स्‍केलेबिलिटी, केंद्रित धोरणे, सर्वोत्तम समन्‍वय व सुसंगता, तसेच कार्यरत कार्यक्षमतेला चालना मिळेल.”

Related posts

एिझकॉम टेल-सिटस लमटेडची 27 फे वु ार 2024 रोजी सु होणार ाथमक स ा व ज न क ऑ फ र

Shivani Shetty

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सकडून रोडसाइड असिस्टंस प्रोग्रामची घोषणा

Shivani Shetty

केसांच्या समस्यांवर एआय तंत्रज्ञानावर आधारित उपचार

Shivani Shetty

Leave a Comment