maharashtraprimenews
ठळक बातम्या
अंबरनाथआंतरराष्ट्रीयआरोग्य वार्ताउल्हासनगरकर्जतकलाकल्याणकोकणकोल्हापूरक्रीडागुजरातगुन्हेचित्रपटजळगावठळक बातम्याठाणेडोंबिवलीदिल्लीनवी दिल्लीनवी मुंबईनागपूरनाटकनांदेडनालासोपारानाशिकनेरळपंढरपूरपनवेलपालघरपिंपरी/चिंचवडपुणेबदलापूरबॉलीवूडबोरगांव/माणगांवमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रमुंबईमुरुड/जंजिरारत्नागिरीरायगडराष्ट्रीयलेखवसईविदर्भविरारशहापूरसंपादकीयसांगलीसातारासाहित्यसोलापूरहॉलिवूड

भास्कर जाधवांच्या मुलाचा पोलिसांवर गंभीर आरोप, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 20 Oct 2022, 7:57 am

Maharashtra Politics | आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला हल्ल्याच्या प्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांसह मविआच्या कार्यकर्त्यांनी चिपळूण पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला होता. या सगळ्याप्रकरणी हल्लेखोरांवर तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली. कोणाच्या आदेशानुसार भास्कर जाधव यांची सुरक्षा काढण्यात आली असा सवाल पोलीस अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी विचारला. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज.

 

हायलाइट्स:स्वतःला प्रसिद्धी मिळावी यासाठी भास्कर जाधव यांनीच षडयंत्र रचलेभाजपचा भास्कर जाधव यांच्यावर आरोपत्यांच्या अंगणात केवळ स्टम्प व रिकामी बॉटल मिळालीरत्नागिरी: आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी नवी माहिती समोर येण्याची शक्यता असून पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलीस करत आहेत.दरम्यान भास्कर जाधवांनीच (Bhaskar Jadhav) हे स्वतःला प्रसिद्धी मिळावी सुरक्षा मिळावी यासाठी हे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप भाजप नेते परिमल भोसले यांच्याकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी वाय प्लस सुरक्षा काढण्यात आल्याचे पत्र भास्कर जाधव यांना मंगळवारी रात्री देण्यात आले. त्यानंतरच काहीवेळात हा हल्ला झाला. त्यामुळे या सगळ्याची गंभीर दखल पोलिसांकडून घेण्यात आली आहे.‘माझ्या नादाला लागायचं काम नाही, याद राखा पुन्हा माझ्यावर बोललात तर…’ चित्रा वाघ संतापल्यामात्र, भाजपने भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ला केवळ एक बनाव असल्याचे म्हटले आहे. गाडीच्या काचा फोडणे, घराच्या काचा फोडणे याला भ्याड हल्ला म्हणतात. हे सगळं केवळ एक षडयंत्र आहे. त्यांच्या अंगणात केवळ स्टम्प व रिकामी बॉटल मिळाली. याला भ्याड हल्ला म्हणत नाहीत. हा सगळा भास्कर जाधव यांनीच रचलेला कट असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. चिपळूण शहरातील आमचे बॅनर ज्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी फाडले त्यांचावर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा. अन्यथा भाजप आंदोलन करेल रस्त्यावर उतरून हायवे जाम केला जाईल, असा इशारा भाजपकडून देण्यात आला.

अरे जा काय करायचं ते करा, मी नाही घाबरत ; घरावर झालेल्या हल्ल्याबाबत भास्कर जाधव आक्रमक

आमची सिक्युरिटी काढली आणि हल्ला झाला: विक्रांत जाधवरात्री-अपरात्री आमच्या घरावर झालेला हल्ल्याचा मी निषेध करतो. सरकार कोणाचेही असो पण कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम सरकारचे आहे, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांचे सुपूत्र माजी जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी माजी खासदार नीलेश राणे यांनी चिपळूणमध्ये येऊन असंसदीय शब्दात टिका केली होती असा आरोप करत वैभव नाईक यांच्या चौकशी विरोधात निघालेल्या मोर्चाला भास्कर जाधव यांनी संबोधित केले. त्यानंतर अशा स्वरूपाचे हल्ले होतील असा अंदाज होता. ही शक्यता लक्षात घेऊन चिपळूण पोलीस निरीक्षक शिंदे यांना भास्कर जाधवांच्या स्वीय सहाय्यकाने कॉल करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यास सांगितले होते. पण पोलिसांनी मध्यरात्री अचानक सिक्युरिटी काढून घेतली आणि थोडयाचवेळात हल्ला झाला, असा आरोप भास्कर जाधव यांचे पुत्र माजी जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केला आहे.महत्वाचे लेखचिपळूणमध्ये वातावरण तापले; पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकारी दाखल; भास्कर जाधवांना अटक करण्याची मागणी

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Related posts

सोनी सबवरील मािलका ‘पुष्पा इम्पॉिसबल’मधील गिरमा पिरहार वयै िक्तक जीवन व कामामध्येकशापर्कारेसंतलु नराखते?चलाजाणूनघेऊया!

Shivani Shetty

ऑडी इंडियाकडून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्‍ये ३३ टक्‍के वाढीची नोंद

Shivani Shetty

अरेरे! सोनी सबवरील माललका ‘पष्ु पा इम्पॉलसबल’मध्ये कुंुजबाला पटेल कुटुुंबाच्या घरात पडून जखमी

Shivani Shetty

Leave a Comment