सिंधुदुर्ग: मालवण तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे. येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. तिने राहत्या घरीट ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अज्ञाप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. शाळेत असताना अतिशय हुशार असलेल्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच आंगणेवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांनीही या ठिकाणी धाव घेतली होती.
हेही वाचा -२६/११ च्या धर्तीवर मुंबईत तीन ठिकाणी पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क
याप्रकरणी अल्पवयीन मुलीचे आजोबा आणि बहीण यांच्याकडून पोलिसांनी प्राथमिक माहिती घेतली आहे. या अल्पवयीन मुलीने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर येताच खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळाल्यावर मालवण पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचानामा करून मृतदेह ताब्यात घेतला.
दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलीप्रकरणी मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी तिने बहिणीला मेसेज पाठवले होते. बहिणीने याबबतची माहिती मालवण पोलीसांना दिली आहे. त्यामुळे मालवण पोलिसांनी आत्महत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मोबाईल तपासासाठी ताब्यात घेतला आहे. मोबाईलमधील मेसेजची तपासणी तसेच नातेवाईकांची जबाब नोंदणी केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी माहिती देताना सांगितले.
हेही वाचा -पालघरमध्ये खळबळ; पाच वर्षीय मुलीचे अपहरण; परक्या नव्हे, आपल्याच माणसाने केला घात
पिकाचे पैसे आले की मुलीच लग्न करु अशी त्या बापाची इच्छा; पण उद्धवस्त झालेलं सोयाबीन पाहून शेतकऱ्याची आत्महत्या